भारताने क्रिकेटविश्वाला अनेक मोठी नावे दिली. यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे लिटिल मास्टर सुनील गावस्कर. आपल्या बहारदार आणि यशस्वी कारकिर्दीने त्यांनी भारताला क्रिकेटविश्वात एक वेगळीच उंची गाठून दिली. हा महान फलंदाज आज वयाच्या ७०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या साऱ्या शुभेच्छांमध्ये गावस्कर यांचा क्रिकेटमधील मुंबईकर वारसदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गावस्करांना मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. ”आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने क्रिकेटच्या मैदानावर असंख्य सामने जिंकून, चाहत्यांची मने जिंकणारा, महान क्रिकेटपटू, Sunil Gavaskar, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पुढील वर्ष सुखाचे जावो”, या शब्दात त्याने सुनील गावस्कर यांचे अभिष्टचिंतन केले आहे.
आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने क्रिकेटच्या मैदानावर असंख्य सामने जिंकून, चाहत्यांची मने जिंकणाऱ्या, महान क्रिकेटपटू, Sunil Gavaskar, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पुढील वर्ष सुखाचे जावो. pic.twitter.com/R2TXZEafqA
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2018
सचिनव्यतिरिक्त अजूनही अनेकांनी गावस्कर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2018 10:57 am