मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. सध्या जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सचिनने यंदा वाढदिव स साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातलाय ताईत बनलेल्या सचिनवर आजही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मात्र सचिनने आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय साध्या पद्धतीने केली आहे.

सकाळी उठल्यानंतर आवरुन झाल्यानंतर सचिनने आपल्या आईच्या पाया पडत तिचे आशिर्वाद घेतले. यानंतर सचिनच्या आईने त्याला एक गणपतीची छोटी मुर्ती भेट दिली. हा सुंदर प्रसंग सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

क्रिकेट या खेळाला भारतात एका धर्माचं स्वरुप आहे. सध्या करोनामुळे क्रिकेटच्या सर्व स्पर्धा रद्द झालेल्या असल्या तरीही क्रिकेटप्रेमी टीव्ही, सोशल मीडियावर जुन्या सामन्यांच्या व्हिडीओत स्वतःचं मन रमवताना दिसतात. सचिन रमेश तेंडुलकर हा समस्त भारतीयांसह जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. दरम्यान सध्याच्या खडतर काळात सचिन आपलं सामाजिक भान राखून आहे. करोनाविरुद्ध लढ्यात सचिनने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत केली आहे. याचसोबत अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांसोबत सचिन स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यामध्ये अग्रेसर आहे.