03 March 2021

News Flash

बेन स्टोक्सच्या ‘ड्रीम टीम’मध्ये सचिन, वीरू

वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना स्टोक्सने पसंती दिली.

स्टोक्सने निवड केलेल्या संघात त्याने दोन भारतीय खेळाडूंचा समावेश केला

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला. बेन स्टोक्स आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. स्टोक्सवर पुण्याने तब्बल साडेचौदा कोटींची बोली लावून संघात दाखल करून घेतले. पुण्याचा आज सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. यात सर्वांचे लक्ष बेन स्टोक्सच्या कामगिरीकडे असेल. इंग्लंडच्या स्टोक्सने गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्टोक्सचे अष्टपैलू गुण पुण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी आहे.

दरम्यान, बेन स्टोक्सने एका प्रमोशनल कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी स्टोक्सला त्याच्या ‘ड्रीम टीम’बद्दल विचारण्यात आले.
स्टोक्सने निवड केलेल्या संघात त्याने दोन भारतीय खेळाडूंचा समावेश केला. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना स्टोक्सने पसंती दिली. तर इंग्लंडच्या अॅलिस्टर कूक आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश केला. याशिवाय, स्टोक्सने वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू कर्टली अॅम्ब्रोज यांचीही निवड केली.

अशी आहे बेन स्टोक्सची ‘ड्रीम टीम’ –
वीरेंद्र सेहवाग (भारत), अॅलिस्टर कूक (इंग्लंड), हाशिम अमला (द.आफ्रिका), रिकी पॉन्टींग (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत), सर गारफील्ड सोबर्स (वेस्ट इंडिज), अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), कर्टली अॅम्ब्रोज (वेस्ट इंडिज) , जेम्स अँडरसन (इंग्लंड)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 8:23 pm

Web Title: sachin tendulkar virender sehwag part of ben stokes dream xi
Next Stories
1 IPL 2017, RPS vs MI : पुण्याची ‘स्मित’ खेळी, मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय
2 IPL 2017: टीव्हीवर तेव्हा पाहिलेला तडाखेबाज युवराज पुन्हा पाहिला: वॉर्नर
3 IPL 2017: दिल्ली संघातील ऋषभ पंतच्या वडिलांचे आकस्मिक निधन
Just Now!
X