13 August 2020

News Flash

सचिन, लक्ष्मणवर हितसंबंधांचा ठपका ; ‘बीसीसीआय’च्या लवाद अधिकाऱ्यांकडून नोटीस

सचिन आणि लक्ष्मण अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांसाठी मार्गदर्शक आहेत.

| April 25, 2019 12:49 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांच्याकडून हितसंबंधांसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार समितीवर कार्यरत असलेले हे दोघे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मार्गदर्शक म्हणूनसुद्धा कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

सचिन आणि लक्ष्मण अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांसाठी मार्गदर्शक आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यानंतर ही आणखी दोन प्रकरणे उजेडात आली आहेत. गांगुली हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्सचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

सचिन, लक्ष्मण आणि गांगुली या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने जुलै २०१७मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदावर रवी शास्त्री यांची नियुक्ती केली. माजी न्यायमूर्ती जैन यांनी आपल्या नोटिशीत सचिन आणि लक्ष्मणला २८ एप्रिलपर्यंत लिखित उत्तर द्यायला सांगितले आहे. याचप्रमाणे ‘बीसीसीआय’लाही यासंदर्भात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर ही कार्यवाही झाली आहे.

सचिन आणि लक्ष्मणला पाठवलेल्या नोटिशीत जैन यांनी म्हटले आहे की, ‘‘माझ्याकडे ‘बीसीसीआय’च्या नियमावली अंतर्गत कलम ३९ अन्वये तक्रार आली आहे. यानुसार घटनेच्या आधारे हितसंबंधांचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला २८ एप्रिलपर्यंत लिखित उत्तर देणे बंधनकारक आहे. याची प्रत ‘बीसीसीआय’कडेही बाजू मांडण्यास पाठवण्यात आली आहे.’’

बुधवारी सचिन त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करीत असल्यामुळे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. याचप्रमाणे लक्ष्मणची प्रतिक्रियासुद्धा उपलब्ध होऊ शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2019 12:49 am

Web Title: sachin tendulkar vvs laxman receives conflict of interest notice from bcci
टॅग IPL 2019
Next Stories
1 Video : डीव्हिलियर्सने एका हाताने लगावलेला षटकार थेट स्टेडियमच्या छतावर
2 IPL 2019 : डीव्हिलियर्स-स्टॉयनीस जोडीचा दणका; शेवटच्या २ षटकात कुटल्या ४८ धावा
3 IPL 2019 : मूर्ती लहान, किर्ती महान ! विराट-डिव्हीलियर्सला न जमलेली कामगिरी पार्थिव पटेलच्या नावावर
Just Now!
X