२०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यात सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावलं होतं. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा सचिन पहिल खेळाडू ठरला होता. आफ्रिकन गोलंदजांची धुलाई करत सचिनने या सामन्यात तब्बल २५ चौकार मारले होते. मात्र दक्षिण आफ्रिदेचा गोलंदाज डेल स्टेनने केलेल्या दाव्यानुसार या सामन्यात स्टेनने सचिननला द्विशतकाआधी काही धावा असताना बाद केलं होतं, मात्र पंच इयन गुल्ड यांनी सचिनला जीवदान दिलं.

“ग्वालियारच्या सामन्यात सचिनने आमच्याविरुद्ध पहिल्यांदा वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं. या सामन्यात मला आठवतंय सचिन १९०+ वर खेळत असताना मी त्याला पायचीत पकडलं होतं. मी सचिनविरोधात जोरदार अपीलही केलं, पण पंच इयन गुल्ड यांनी माझं अपील फेटाळून लावलं. यानंतर मी त्यांना, तूम्ही आऊट का दिलं नाहीत असं विचारलं…त्यावेळी गुल्ड यांच्या चेहऱ्यावर….मित्रा आजुबाजूला बघ, आता मी सचिनला आऊट दिलं तर मी हॉटेलवर पोहचू शकणार नाही असे भाव होते.” डेल स्टेन Sky Sports वाहिनीच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता.

अवश्य वाचा – विराट सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकणार नाही – केविन पिटरसन

सचिनच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने या सामन्यात ३ गड्यांच्या मोबदल्यात ४०१ धावांचा पल्ला गाठला होता. दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवलं नाही, १५३ धावांनी भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला होता.