भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडल्यास त्याचा आदर्शवत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून एक खास भेट त्याला मिळणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम सध्या सचिनच्या नावावर आहे. मात्र विराटने हा विक्रम मागे टाकल्यास त्याच्यासोबत शॅम्पेन पिऊन हा आनंद साजर करू, अशी ग्वाही सचिनने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटच्या खात्यावर सध्या ३५ एकदिवसीय शतके जमा आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा विक्रम विराटने मोडीत काढल्यास ५० शॅम्पेनच्या बॉटल त्याला भेट म्हणून देईल का, या प्रश्नाला उत्तर देताना सचिन म्हणाला, ‘‘विराटने हा विक्रम मोडल्यास मी त्याला शॅम्पेनच्या बॉटल्स मुळीच पाठवणार नाही. त्याऐवजी मी स्वत: जाऊन त्याच्यासोबत शॅम्पेन पिऊन हा आनंद साजरा करणार आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar will celebrate virat kohli record of breaking hundreds with shampion
First published on: 24-04-2018 at 03:24 IST