News Flash

Independence Day 2018 : सचिनने भारतीयांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या शुभेच्छा, म्हणाला…

'जर या भारतमातेसाठी शूरवीरांनी बलिदान दिले नसते, तर आज 'टीम इंडिया' नसती!'

सचिन तेंडुलकर

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीत आहे. या मालिकेतील 2 सामने झाले अडून त्यातील एक सामना भारताने लढत देऊन गमावला तर दुसऱ्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या कारणामुळे सध्या भारतीय चाहते काहीसे अस्वस्थ असून विराट सेना फॉर्ममध्ये येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीयांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्याने ट्विटच्या माध्यमातून भारतीयांना शुभेच्छा दिल्या असून या भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मरण केले आहे. त्याने लिहिले आहे की आयुष्यात प्रत्येक गोष्ट हि अत्यन्त कष्टाने मिळते. त्यापैकी एक म्हणजे आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य. याशिवायही अशा अनेक अगणित गोष्टी आहेत, ज्यामुळे आज ‘टीम ईंडीया’ अस्तित्वात आहे. जर या भारतमातेसाठी शूरवीरांनी बलिदान दिले नसते, तर आज ‘टीम इंडिया’ नसती, असेही त्याने या संदेशात लिहिले आहे.

दरम्यान, शूरवीरांनी दिलेले बलिदान हे अमूल्य आहे. त्यामुळे आपले स्वातंत्र्य हे गृहीत धरू नका, असेही सचिनने लिहीले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 12:30 pm

Web Title: sachin tendulkar wishes indians happy independence day and salutes freedom fighters
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 भारतीय संघात निवड न झाल्यामुळे कामगिरीवर परिणाम!
2 भारतीय खेळाडूंना आणखी सराव सामन्यांची आवश्यकता काय?
3 वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे मोहम्मद सलाह अडचणीत
Just Now!
X