News Flash

सचिनच्या निवृत्तीने देश भावनिक- युवराज सिंग

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात तडफदार 'कमबॅक' करत युवराजने नाबाद ७७ धावांची साकारली खरी पण जरी याचा आनंद त्याला असला तरी,

| October 11, 2013 03:34 am

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात तडफदार ‘कमबॅक’ करत युवराजने नाबाद ७७ धावांची साकारली खरी पण जरी याचा आनंद त्याला असला तरी, सचिनच्या निवृत्तीची खंत जास्त असल्याचे युवराजने म्हटले आहे. तसेच भारताच्या या क्रिकेटवीराची निवृत्ती म्हणजे फक्त मीच नाही संपुर्ण देश भावूक झाला असेल असेही युवराज म्हणाला.
सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाची बातमी समजताच युवराजने आपली ‘कमबॅक’ खेळी सचिनला समर्पित केली. युवराज म्हणाला, “मलाच समजत नाही आहे की, मी आनंदी आहे की दु:खी. चांगले कमबॅक करु शकलो त्यामुळे आनंदी आणि सचिनची निवृत्ती यावर मन दुखी आहे. परंतु, अशीच खेळी मला पुढील सामन्यांतही साकाराची आहे. त्यादृष्टीनेच माझे प्रयत्न असतील”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2013 3:34 am

Web Title: sachin tendulkars retirement an emotional time for india yuvraj singh
टॅग : Team India,Yuvraj Singh
Next Stories
1 पूर्णविरामाकडे
2 देव निवृत्त होतोय!
3 BLOG: भीमपराक्रमी शेंडेफळाची निवृत्ती!
Just Now!
X