News Flash

सचिनोत्सव!

अवघी मुंबापुरी सचिनोत्सवात न्हाऊन निघालेली आहे. कारकिर्दीतील अखेरचा २००वा कसोटी सामना खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरचा गौरव म्हणून त्याच्या

| November 15, 2013 04:02 am

अवघी मुंबापुरी सचिनोत्सवात न्हाऊन निघालेली आहे. कारकिर्दीतील अखेरचा २००वा कसोटी सामना खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरचा गौरव म्हणून त्याच्या टपाल तिकिटाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.

 

*वेस्ट इंडिजचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर सचिन फलंदाजीसाठी खेळपट्टीकडे रवाना होत असताना वेस्ट इंडिजकडून त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

 

*आपल्या मुलाचा पहिलावहिला सामना पाहण्यासाठी सचिनची आई रजनी तेंडुलकर यांनी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली.

 

*बॉलीवूड अभिनेता आमीर खान

 

*सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर सर पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी आले होते.

 

*पत्नी अंजली, मुलगी सारा आणि भाऊ अजित तेंडुलकर हेसुद्धा सचिनोत्सवात सहभागी झाले होते.

 

*वानखेडे स्टेडियमला सध्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून स्टेडियमच्या बाहेरूनही पोलिसांची करडी नजर आहे.

 

*कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्याआधी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सचिनला ‘एसआरटी’ असे लिहिलेला विशेष चषक देण्यात आला.

 

*पत्रकार कक्षामध्ये व्हीव्हीआयपींचे अतिक्रमण
सचिन तेंडुलकरच्या वानखेडेवरील अखेरच्या सामन्यावेळी बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्षामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) २८ व्हीव्हीआयपी व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. काही जणांच्या म्हणण्यानुसार ‘साइट स्क्रीन’ची उंची जास्त झाल्याने ‘कॉर्पोरेट’ कक्षांमधील प्रेक्षकांची सोय पत्रकार कक्षात केल्याचे समजते. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ही जागा राखीव ठेवल्याचे म्हटले जात आहे. कोणतीही ठोस माहिती नसल्यामुळे याबाबत संदिग्धता असून, एमसीएने याबाबत अद्यापही कोणता खुलासा केलेला नाही. परंतु त्यामुळे पत्रकारांच्या संख्येत मात्र एमसीएला घट करावी लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 4:02 am

Web Title: sachinosto
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 ओझाची कामगिरी सचिनला समर्पित
2 आनंदसाठी महत्त्वाची लढत
3 धोनीसह संघाला प्रोत्साहन देण्याचा राम बाबूचा वसा
Just Now!
X