News Flash

अर्जुनवीर सदा शेटय़े यांचा अमृतमहोत्सव सोहळा साजरा

‘‘कबड्डी खेळाडूही आपल्या कुटुंबीयांच्या ध्येयप्राप्तीसाठी एवढी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, हे पाहून समाधान वाटले.

| August 6, 2013 04:46 am

 ‘‘कबड्डी खेळाडूही आपल्या कुटुंबीयांच्या ध्येयप्राप्तीसाठी एवढी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, हे पाहून समाधान वाटले. शेटय़े यांनी कबड्डीच्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्या कुटुंबालादेखील एवढा वेळ दिल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे,’’ असे उद्गार अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी सदा शेटय़े यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काढले.
परळ येथील मध्य रेल्वेच्या सभागृहात काही नातलग आणि कबड्डी परिवारातील व्यक्तींच्या उपस्थितीत शेटय़े यांचा अमृतमहोत्सव सोहळा पार पडला. या वेळी त्यांच्या कबड्डी प्रवासातील निवडक प्रसंग स्लाइड्सच्या माध्यमातून दाखवण्यात आले. शेटय़े यांना शुभेच्छा देण्याकरिता अर्जुन पुरस्कारविजेत्या मोनिका नाथ, राज्य कबड्डी संघटनेचे सचिव रमेश देवाडिकर, छत्रपती पुरस्कारविजेते सीताराम साळुंखे, तारक राऊळ, छाया देसाई-पवार यांच्यासह आजी-माजी कबड्डीपटू या सोहळ्याला उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 4:46 am

Web Title: sada sattaye platinum jubilee ceremony celebrated
Next Stories
1 माझ्या वक्तव्याचा विपर्यास- राहुल द्रविड
2 सईद नाबीला वगळले ; ताजिकिस्तान विरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर
3 संघावरील ‘व्हाईट वॉश’चे संकट टळले; हीच आमच्यासाठी चांगली सुरुवात- डॅरेन लेहमन
Just Now!
X