News Flash

सागर धनखड हत्या प्रकरण : साक्षीदारांचे रक्षण करण्यासाठी सरकारने पावले उचलावी!

साक्षीदार संरक्षण योजना २०१८ अंतर्गत २ जूनपासून एक आठवडाभरात या प्रकरणातील साक्षीदारांचे रक्षण करा

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारचा कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात सहभाग असून या प्रकरणातील साक्षीदारांच्या रक्षणासाठी पावले उचला, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत.

साक्षीदार संरक्षण योजना २०१८ अंतर्गत २ जूनपासून एक आठवडाभरात या प्रकरणातील साक्षीदारांचे रक्षण करा, असे आदेश न्यायमूर्ती सुरेश के. कैत यांनी दिल्ली सरकारला दिले आहेत.

छत्रसाल स्टेडियममधील घटनेप्रसंगात सुशीलने आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप वकील अजय कुमार आणि पल्लवी पिपानिया यांनी केला आहे. या साक्षीदारांनी पोलीस संरक्षण देण्यासंदर्भात केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सुशीलचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असून त्याच्याविरोधात जबानी देऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे या गुंडांकडून माझ्या जिविताला धोका आहे, असेही पिपानिया यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 2:14 am

Web Title: sagar dhankhar murder case olympic medalist sushil kumar akp 94
Next Stories
1 भारतीय पुरुष संघाला ऑलिम्पिक पदकाची खात्री -वाल्मीकी
2 ज्येष्ठ क्रिकेट गुणलेखकांना निवृत्तीनंतर मानधन द्यावे!
3 वडिलांच्या निधनानंतर शास्त्री यांच्या पाठबळामुळे मतपरिवर्तन -सिराज
Just Now!
X