29 September 2020

News Flash

सागर मोरेची अंतिम फेरीत धडक; सानिकेत राऊत चीतपट

सागरने कुंभी कासारीच्या सानिकेत राऊतला चीतपट करीत अस्मान दाखवले.

सागर मोरे (निळी जर्सी) आणि मनोज चव्हाण (लाल जर्सी) यांच्यातील उपांत्यपूर्व लढतीमधील क्षण.

राज्यस्तरीय  कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या कामगार केसरी कुस्ती स्पर्धेत विठ्ठल कॉर्पोरेशनच्या सागर मोरेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सागरने कुंभी कासारीच्या सानिकेत राऊतला चीतपट करीत अस्मान दाखवले. याचप्रमाणे किसनवीर कारखान्याच्या अभिषेक तुर्कावडेने भोगावती साखर कारखान्याच्या हृषीकेश पाटीलवर विजय मिळवला.

कुमार केसरी गटात कुंभी कासारीच्या संदीप जामदाने आक्रमक खेळी करीत किसनवीर कारखान्याच्या चंदन मरगजेवर वर्चस्व मिळवले. ५७ किलो वजनी गटात कोल्हापूर तालीम संघाच्या पवन भईगडे आणि कुंभी कासारीच्या विक्रम मोरे यांच्यात अंतिम लढत होणार आहे. ७० किलो वजनी गटात कुंभी कासारीच्या माणिक कारंडे आणि क्रांती अग्रणीचा अक्षय जाधव यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

अन्य निकाल

५७ किलो वजनी गट : विक्रम मोरे (कुंभी कासारी) विजयी वि. सचिन सावंत (यशवंत ग्लुकोज); पवन भुईगडे (कोल्हापूर) विजयी वि. शशिकांत गावडे (क्रांती सहकारी); ६१ किलो : अक्षय बहीरवाल (श्रीराम तालीम संघ) विजयी वि. श्रीकांत शेणवी (जयवीन हनुमान आखाडा); नामदेव घाडगे (दुधगंगा वेदगंगा) विजयी वि. यादव मामडे (बजाज ऑटो); ७४ किलो : जयसिंग जाधव (विठ्ठल कॉपरेरेशन) विजयी वि. अनिकेत गावडे (क्रांती अ‍ॅग्रो); नामदेव केसरे (वारणा दूध) विजयी वि. नागेश शिंदे (उस्मानाबाद)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:26 am

Web Title: sagar more reached in final round of kamgar kesari wrestling tournament
Next Stories
1 उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेल्या रशियाच्या सर्जीयेवाची हकालपट्टी
2 युरोपा लीग फुटबॉल : आर्सेनल घरच्या मैदानावर पराभूत
3 आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : विकास, गौरवचे पदक निश्चित
Just Now!
X