20 September 2020

News Flash

चार आंतरराष्ट्रीय नेमबाजांना ‘साइ’कडून अर्थसाहाय्य

आशियाई पदक विजेता रंजन सोधी याच्यासह चार नेमबाजांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

| February 8, 2014 01:32 am

आशियाई पदक विजेता रंजन सोधी याच्यासह चार नेमबाजांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत ‘साइ’चे चिटणीस नीरज कौशल यांनी सांगितले की, ‘‘राष्ट्रकुल स्पध्रेत दोन रौप्यपदके जिंकणारा व आशियाई सुवर्णपदक विजेता सोधी, ऑलिम्पिकपटू शगुन चौधरी, जागतिक सुवर्णपदक विजेती हीना सिद्धू व राष्ट्रकुल तसेच आशियाई पदक विजेता मानवजितसिंग संधू यांना आतापर्यंत प्रत्येकी पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. ग्रॅनाडा येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेपूर्वी त्यांना युरोपात प्रशिक्षण घेण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. होतकरू खेळाडूंना परदेशातील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची योजना आम्ही अनेक वर्षे अमलात आणली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 1:32 am

Web Title: sai sanctions rs 2 crore to four top shooters for cwg asian games
टॅग Asian Games,Sai
Next Stories
1 हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : भारतीय खेळाडू आयओसीच्या ध्वजानिशी संचलनात सहभागी
2 गोलंदाजी योग्य झाली पण, ब्रेन्डनने प्रखर फलंदाजी केली- मुरली विजय
3 आमच्या गोलंदाजांमध्ये भारताच्या २० विकेट्स घेण्याची क्षमता- ब्रेन्डन मॅक्क्युलम
Just Now!
X