News Flash

सायनाची माघार

आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या तयारीसाठी प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

 

आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या तयारीसाठी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला.

२९ वर्षीय सायनाने गेल्या ‘पीबीएल’ हंगामात नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी, २०२० या कालावधीत होणाऱ्या आगामी हंगामात ती खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘‘मी ‘पीबीएल’च्या पाचव्या हंगामाचा भाग नसेन. या संपूर्ण वर्षांत दुखापतीमुळे माझी कामगिरी खालावली. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कामगिरी उंचावण्यासाठी मी लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सहाव्या हंगामात मी जरूर खेळेन. मी माझ्या सर्व चाहत्यांची दिलगिरी प्रकट करते,’ असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने सांगितले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील सायनाला चालू वर्षांत विजयासाठी झगडावेच लागले. सहा स्पर्धामध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली. त्यामुळेच हा निर्णय तिने घेतल्याचे बॅडमिंटन क्षेत्रात म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:29 am

Web Title: saina decides not to play in the premier badminton league abn 97
Next Stories
1 डेव्हिस चषक लढतीत भारताचे पारडे जड!
2 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : पृथ्वीमुळे मुंबईचा विजय
3 किपचोगे, मुहम्मद जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटू
Just Now!
X