News Flash

Thailand Open Badminton : दुसऱ्याच फेरीत सायना नेहवाल पराभूत

बिगर मानांकित जपानी खेळाडूचा सायनाला धक्का

दुखापतीमुळे गेले काही महिने मैदानाबाहेर असलेल्या सायना नेहवालला, आपल्या पहिल्याच स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. थायलंड ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत सायनाला आपला गाशा गुंडाळावा लागला. जपानची बिगर मानांकीत खेळाडू सायका ताकाहाशीने सायनावर मात केली.

सातव्या मानांकीत सायना नेहवालने पहिला सेट २१-१६ च्या फरकाने जिंकत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतरच्या सेटमध्ये ताकाहाशीने दमदार पुनरागमन करत ११-२१ आणि १४-२१ अशी खेळी करत सायनाचं आव्हान मोडून काढलं. सायना नेहवालच्या या पराभवामुळे या स्पर्धेतलं भारतीय महिलांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सिंधूने या स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 4:38 pm

Web Title: saina nehwal crashes out in second round of thailand open psd 91
टॅग : Saina Nehwal
Next Stories
1 ऑलिम्पिक पदक मिळवणं सोपी गोष्ट नाही, मी पूर्ण प्रयत्न करेन – मेरी कोम
2 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी २ हजार अर्ज
3 तुफान आलंया! २८ चेंडूत १४ षटकारांसह झळकावलं शतक
Just Now!
X