07 July 2020

News Flash

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा: ‘फुलराणी’ला पराभवाचा धक्का!

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची 'फुलराणी' सायना नेहवालला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

| August 9, 2013 02:21 am

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
कोरियाच्या यिआन ज्यूने सायना नेहवालला पराभवाचा धक्का दिला. यिआनने  सायनावर २१-२३, ९-२१ अशी मात केली आणि स्पर्धेच्या उपांत्यफेरीचे दार ठोठावले.  सलामीच्या लढतीतील विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या सायनाने १५व्या मानांकित थायलंडच्या पॉर्नटिप बुरनाप्रासटुस्कवर १८-२१, २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला होता. त्यानंतर या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पुढे चाल मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सायनाने ओल्गा वोल्वानोव्हा हिचा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला होता. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत सायनाची खेळी डळमळताना दिसली. यिआन ज्यूने सामन्यात सुरुवातीपासूनच बळकट सुरूवात केली. सामन्यात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांना सायनाला यश मिळाले नाही आणि अखेरीस सायनाला पराभवाला सामोर जावे लागले. त्यामुळे विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील सायनाचे आव्हान संपुष्टात आले आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2013 2:21 am

Web Title: saina nehwal faces lost in world championship
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 रैना, पुजारा, धवनची कसोटी
2 मेरी कोमच्या बॉक्सिंग अकादमीला क्रीडा मंत्रालयाकडून निधी मंजूर
3 विजयी अभियान!
Just Now!
X