News Flash

सायनापुढे सलामीलाच ताय झूचे कडवे आव्हान

ताय झू यिंगने गेल्या महिन्यात इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला पराभूत केले होते.

| February 23, 2018 03:14 am

सायना नेहवाल

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

पुढील महिन्यात होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालपुढे सलामीलाच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानावर विराजमान असणाऱ्या तैवानच्या ताय झू यिंगचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र पी. व्ही. सिंधूला पहिला अडथळा ओलांडणे फारसे अवघड जाणार नाही.

जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या सायनाने २०१५मध्ये ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. ताय झू यिंगने गेल्या महिन्यात इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला पराभूत केले होते. त्याची परतफेड करण्याची संधी १४ ते १८ मार्च या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत सायनापुढे असणार आहे.

सिंधूचा पहिला सामना थायलंडच्या पोर्नपावी चोच्युवाँगशी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेवेन झांगशी तिचा सामना होऊ शकेल. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत झांगनेच सिंधूला हरवले होते.

मागील हंगामात चार विजेतेपदांसह विजयी घोडदौड राखणाऱ्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या किदम्बी श्रीकांतची पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्रिसे लीव्हरडेझशी गाठ पडणार आहे. पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांच्यापुढे पहिल्या फेरीत आव्हानात्मक प्रतिस्पर्धी असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:14 am

Web Title: saina nehwal faces tai tzu ying in all england open
Next Stories
1 विद्यार्थी-पालकांना क्रीडापटू घडवण्याचा ध्यास!
2 आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम व सरिता देवीचे पदक निश्चित
3 रशियाचा अलेक्झांडर उत्तेजकप्रकरणी दोषी
Just Now!
X