इंडियन बॅडमिंटन लीग(आयबीएल) स्पर्धेसाठी आज सोमवार बॅडमिंटन खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल या आयबीएल लीग मध्ये ‘हैदराबाद हॉटशॉट्स’ संघाकडून खेळताना दिसणार आहे. लीगच्या लिलावात ‘हैदराबाद हॉटशॉट्स’ने सायना नेहवालसाठी सर्वाधिक ५०,००० यूएस डॉलर्स(२९,७०,४८२ रू) इतकी बोली लावली. त्यानुसार सायना हैदराबाद हॉटशॉट्स संघाचे नेतृ्त्व करणार आहे.
लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या लंडनच्या बॉब हटन यांची आयबीएलच्या लिलावाकरिता नियुक्ती करण्यात आली होती. एकूण १५० आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू या लिलावासाठी उपलब्ध होते. त्यानुसार आयबीएलच्या सहा संघासाठी खेळाडू निवडण्यात आले. प्रत्येक संघात ११ खेळाडू असणार आहेत.
आयबीएलमधील संघ आणि त्यांचे मालक
१. क्रिश दिल्ली स्मॅशर्स
मालक: क्रिश समूह
२. लखनऊ वॉरियर्स
मालक : सहारा परिवार
३. पुणे पिस्टॉन्स
मालक : बर्मन परिवार
४. मुंबई मास्टर्स
मालक : सुनील गावस्कर, नागार्जुन आणि व्ही. चामुंडेश्वरनाथ
५. बांगा बीट्स
मालक : बीओपी समूह
६. हैदराबाद हॉटशॉट्स
मालक : पीव्हीपी समूह