भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिला जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) २०१२ मधील सवरेत्कृष्ट महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.  
लंडन ऑलिम्पिक विजेती लिउ झुरुई, रौप्यपदक विजेती वँग यिहान, ऑलिम्पिक दुहेरी विजेत्या तियान क्विंग व झाओ युनलेई या चीनच्या चार खेळाडूंनाही सवरेत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सायनाने गतवर्षी इंडोनेशियन खुली व डेन्मार्क खुली या दोन ग्रां. प्रि. स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच तिने थायलंड खुली व स्विस खुली स्पर्धाही जिंकल्या आहेत. दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा लिन डॅन, मलेशियाचा लीचोंग वेई, तसेच चेन लिआंग, काई युआन व फु हैफेंग यांच्यात पुरुषांच्या सवरेत्कृष्ट खेळाडू किताबासाठी चुरस आहे.