News Flash

सायनाला पराभवाचा धक्का

मोसमातील पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. चीन

| November 15, 2013 03:32 am

मोसमातील पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. चीन सुपर सीरिज स्पर्धेत दमदार सलामी देणाऱ्या सायनाला दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या बिगरमानांकित सून यूनने सायनावर २१-१६, १५-२१, २१-१७ अशी मात केली. तसेच पारुपल्ली कश्यप आणि अरुंधती पनतावणे यांचाही पराभव झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हानच संपुष्टात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 3:32 am

Web Title: saina nehwal parupalli kashyap crash out of china open
टॅग : Saina Nehwal
Next Stories
1 वानखेडे बेभान-वेडे!
2 सबकुछ सचिन..
3 दिवसाचा शेवट गोड; सचिनच्या नाबाद ३८ धावा
Just Now!
X