07 July 2020

News Flash

इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना सज्ज!

इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेचे तीनवेळा विजेतेपद पटकावणारी भारताची फूलराणी सायना नेहवाल उद्या पासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया बॅडमिंटन या स्पर्धेचे विजेतेपद स्वत:जवळ कायम राखण्याच्या उद्देशाने

| June 10, 2013 05:45 am

इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेचे तीनवेळा विजेतेपद पटकावणारी भारताची फूलराणी सायना नेहवाल उद्या पासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया बॅडमिंटन या स्पर्धेचे विजेतेपद स्वत:जवळ कायम राखण्याच्या उद्देशाने खेळण्यास सज्ज आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनासाठी गेले काही महिने निराशाजनक राहीले आहेत. यावर्षाच्या सुरूवातीला झालेल्या ऑल इंग्लंड आणि स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सायनाला एकाही बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत सायनाच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय बॅडमिंटन रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. सायनाचा इंडोनेशियातील स्थानिक खेळाडूशी पहिला सामना आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2013 5:45 am

Web Title: saina nehwal ready for indonesian super series premier badminton tournament
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 किवींचा लंकेवर सनसनाटी विजय!
2 इंग्लिश टी-२०, मुनाफला रेड सिग्नल
3 झपाटलेला
Just Now!
X