04 July 2020

News Flash

सायना, प्रणय, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेती सायना नेहवाल, एच.एस.प्रणय आणि के.श्रीकांत या भारतीय खेळाडूंनी थायलंड ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने आपल्या अव्वल मानांकनाला साजेसा खेळ करीत इंडोनेशियाच्या

| June 7, 2013 01:31 am

गतविजेती सायना नेहवाल, एच.एस.प्रणय आणि के.श्रीकांत या भारतीय खेळाडूंनी थायलंड ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने आपल्या अव्वल मानांकनाला साजेसा खेळ करीत इंडोनेशियाच्या फेबी अँगुनी हिच्यावर २१-१२, २१-११ अशी लीलया मात केली. तिने केवळ अध्र्या तासाच्या खेळात ड्रॉपशॉट्स व स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार उपयोग केला. तिला आता आठव्या मानांकित जुआन गुओ या सिंगापूरच्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जुआन हिने आपलीच सहकारी झिओयु लियांग हिच्यावर २१-१३, २१-११ असा विजय संपादन केला.
पुरुषांच्या एकेरीत प्रणयने पहिला गेम गमावल्यानंतर स्मॅशिंगच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत आपलाच सहकारी आनंद पवार याला पराभूत केले. हा सामना त्याने १९-२१, २१-१३, २१-१५ असा जिंकला. पवार याला दहावे मानांकन देण्यात आले होते. तेराव्या मानांकित श्रीकांत याने दक्षिण कोरियाच्या हुआंग जोंग सुओ याचा २१-१९, २१-१५ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. त्याने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला.
भारताच्या बी. साईप्रणित याला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या विष्णू युली प्रसेत्यो याने चुरशीच्या लढतीनंतर त्याच्यावर २१-१८, १६-२१, २१-१९ असा रोमहर्षक विजय नोंदविला.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2013 1:31 am

Web Title: saina prannoy srikanth enter thailand gp quarters
Next Stories
1 कुटुंब रंगलंय सट्ट्यात
2 बीसीसीआय कार्यकारिणीच्या बैठकीत कुंद्रा प्रकरण ऐरणीवर
3 दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान
Just Now!
X