05 March 2021

News Flash

सायना, सिंधू क्रमवारीत स्थिर

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील दुसरे स्थान टिकविण्यात यश मिळवले आहे, तर नुकत्याच झालेल्या मलेशियन ग्रां.प्रि. गोल्ड स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूने

| May 10, 2013 01:03 am

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील दुसरे स्थान टिकविण्यात यश मिळवले आहे, तर नुकत्याच झालेल्या मलेशियन ग्रां.प्रि. गोल्ड स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूने आपले १३वे स्थान कायम राखले आहे. पुरुषांमध्ये पी. कश्यपने ११वे स्थान टिकवले आहे. गेल्याच आठवडय़ात कारकीर्दीतील सर्वोत्तम अर्थात १३वे स्थान गाठणाऱ्या सिंधूने मलेशियन ग्रां.प्रि. गोल्ड स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मात्र या जेतेपदानंतरही तिला क्रमवारीत बढती मिळालेली नाही.
पुरुषांमध्ये आरएमव्ही गुरुसाईदत्तने २७व्या स्थानी झेप घेतली आहे, तर भारतीय खुल्या स्पर्धेत अव्वल खेळाडू तौफिक हिदायतला पराभवाचा धक्का देणारा उदयोन्मुख खेळाडू के. श्रीकांतने क्रमवारीत पाच स्थानांनी आगेकूच करत ४७वे स्थान गाठले आहे. दरम्यान, मुंबईकर अजय जयराम आणि मध्य प्रदेशचा सौरभ वर्मा याचप्रमाणे आनंद पवार यांची क्रमवारीत घसरण झाली आहे.
 अजय २७व्या स्थानावरून ३०व्या स्थानी फेकला गेला आहे. सौरभ वर्मा ३६व्या तर आनंद पवार ४३व्या स्थानावर आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:03 am

Web Title: saina sindhu retain positions
टॅग : P V Sindhu,Saina Nehwal
Next Stories
1 माद्रिद टेनिस स्पर्धा : सानिया-बेथानी मॅटेकचे आव्हान संपुष्टात
2 डाव्यांचा तडाखा!
3 सावध ऐका पुढल्या हाका..
Just Now!
X