News Flash

टेनिस : साकेत मायनेनीला पराभवाचा धक्का

भारताचा डेव्हिसपटू साकेत मायनेनी याच्यावर लेक्झिंग्टन चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली.

| July 30, 2015 12:38 pm

भारताचा डेव्हिसपटू साकेत मायनेनी याच्यावर लेक्झिंग्टन चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली. त्याला इंग्लंडच्या लिआम ब्रॉडी याच्याकडून २-६, १-६ असे पराभूत व्हावे लागले.

मायनेनी व रामकुमार रामनाथन यांनी दुहेरीत वेगवेगळय़ा जोडीदारांसह उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मायनेनी याने बल्गेरियाच्या दिमितार कुत्रोवस्की याच्या साथीत अग्रमानांकित अ‍ॅलेक्स बोल्ट व अँड्रय़ू व्हिटिंग्टन या ऑस्ट्रेलियन जोडीवर ७-५, ५-७, १०-७ असा सनसनाटी विजय मिळविला. रामकुमारने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमेनच्या साथीने सॅम बार्नेट व जेसी व्हिटन यांचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:38 pm

Web Title: saket maineni loose the match
टॅग : Match
Next Stories
1 भारत ‘अ’ संघाची घसरगुंडी
2 आयओसीसोबत चर्चेनंतरच द्युतीबाबत निर्णय
3 जयपूरची विजयी पकड
Just Now!
X