07 July 2020

News Flash

Youth Boxing Championship : साक्षी चौधरीला सुवर्णपदक; मनिषा-अनामिका जोडीला रौप्य

भारताच्या अन्य ६ बॉक्सर्सना कांस्यपदक

भारतीय महिला बॉक्सर्स चमकल्या

बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या Youth Boxing Championship स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सर्सनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. ५७ किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. साक्षीने क्रोएशियाच्या निकोलीना कॅसिकचा पराभव केला. शुक्रवारी याच स्पर्धेत भारताच्या नितूने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

दुसरीकडे भारताच्या अनामिका आणि मनिषा या बॉक्सर्सना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. ५१ किलो वजनी गटात अनामिकाला अमेरिकेच्या डेस्टिनी ग्रेशियाकडून अटीतटीच्या लढाईमध्ये हार पत्करावी लागली. मात्र ६४ किलो वजनी गटात इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनने मनिषावर एकतर्फी मात केली. याचसोबत भारताच्या जॉनी, अस्था पहावा, भावेश कट्टीमणी, अंकित खटाना, नेहा यादव, साक्षी गायधनी या बॉक्सर्सना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 8:33 am

Web Title: sakshi choudhary fetches gold two others clinch silver in world youth boxing
Next Stories
1 कडव्या झुंजीनंतर फेडरर तिसऱ्या फेरीत
2 CSKच्या ‘या’ खेळाडूने वाढदिवशीच घेतला निवृत्तीचा निर्णय…
3 Asian Games 2018 : भारतीय महिलांनी ‘सुवर्ण’संधी गमावली; अंतिम फेरीत जपान २-१ ने विजयी
Just Now!
X