03 December 2020

News Flash

साक्षी धोनीच्या वाढदिवसाचं दुबईत जंगी सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

तुम्ही पाहिलेत का फोटो...

साक्षीच्या वाढदिवसाचं दुबईत जंगी सेलिब्रेशन, फोटो व्हायरल (संग्रहित फोटो)

IPL 2020मध्ये चेन्नईच्या संघाची कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. १४ सामन्यांमध्ये केवळ ६ विजय मिळवत त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. IPLच्या इतिहासात प्रथमच चेन्नईच्या संघाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. महेंद्रसिंग धोनीलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे धोनी लगेच भारतात परतला. मधल्या काळात त्याचा जिममधला एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर आता धोनीचा नवा फोटो व्हायरल झाला आहे. धोनीची पत्नी साक्षी हिच्या वाढदिवसाच्या पार्टीचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

साक्षी धोनीचा आज वाढदिवस. साक्षीने आपला ३२वा वाढदिवस दुबईमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला. साक्षीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी धोनी कुटुंब काही दिवस आधीच दुबईला पोहोचले. तेथे साक्षीने वाढदिवस साजरा केला. साक्षीच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साक्षीच्या वाढदिवसाची पार्टी बुधवारी रात्री उशिरा सुरू झाली. त्यावेळी धोनी झिवाला कडेवर घेऊन पार्टीत साक्षीच्या अगदी बाजूला उभा होता. या पार्टीसाठी धोनी आणि साक्षीची मित्रमंडळीदेखील हजर होती. साक्षीने अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केले. त्यातील काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

पाहा फोटो-

 

दरम्यान, IPLसाठी धोनी आणि कंपनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात युएईत दाखल झाली होती. प्रत्येक खेळाडूला आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन येण्याचे स्वातंत्र्य होते. पण चेन्नईच्या संघाने तसं केलं नाही. त्यांच्या संघातील कर्णधारासह सर्वच जण एकटे स्पर्धेसाठी दाखल झाले. पण इतर संघापेक्षा त्यांचं स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात आलं. त्यामुळे धोनीचा संघ लवकर भारतात परतला. मैदानावर दुहेरी धावा काढताना काहीसा थकलेला धोनी भारतात परतल्यावर पहिला जिममध्ये गेल्याचं दिसून आलं. धोनी आपल्या भावासोबत जिममध्ये धडकला आणि त्याने २०२१ च्या IPL च्या दृष्टीने वर्कआऊटलादेखील सुरूवात केल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 3:19 pm

Web Title: sakshi dhoni celebrates 32nd birthday with ms dhoni ziva and friends in dubai see photos vjb 91
Next Stories
1 ऑस्ट्रेलियात रोहितने स्वतःला सिद्ध केलं तर कर्णधारपद विभागण्याची चर्चा अजून जोर धरेल – शोएब अख्तर
2 IND vs AUS: संजय मांजरेकर यांचं ‘कमबॅक’; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश
3 रविचंद्रन आश्विन भारतासाठी टी-२० मध्ये उपयुक्त ठरु शकतो – मोहम्मद कैफ
Just Now!
X