News Flash

नवऱ्याच्या संघातील क्रिकेटपटूचा ‘गजनी’ लूक पाहून साक्षी धोनी झाली ‘इम्प्रेस’!

दीपक चहरचा नवा लूक सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

दीपक चहरच्या लूकवर साक्षी धोनीची प्रतिक्रिया

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरचा लेटेस्ट ‘गजनी’ लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळलेला चहर आपल्या नव्या लूकमध्ये खतरनाक दिसत आहे. या लूकवर धोनीची पत्नी साक्षी धोनीनेही प्रतिक्रिया दिली असून तिची प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरला आहे.

”नवीन लुक, तुम्हाला कोणता फोटो जास्त आवडला? मला एक निवडता आला नाही, म्हणून मी दोन्ही फोटो शेअर करत आहे”, असे दीपक चहरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. दीपकने शेअर केलेले फोटो तिची बहिण मालती चहरने काढले आहेत. दीपकनेही या फोटोबद्दल तिचे आभार मानले आहेत. ‘खतरनाक लूक दीपक’, असे दीपकच्या फोटोवर भाष्य करताना साक्षीने लिहिले आहे.

हेही वाचा – फ्रेंच ओपनमध्ये रंगणार ‘एल-क्लासिको’ सामना, जोकोविच आणि नदाल असणार आमनेसामने

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

 

Sakshi dhoni highly impressed on new look of pacer deepak chahar दीपक चहरच्या लूकवर साक्षी धोनीची प्रतिक्रिया

 

आयपीएल २०२१मध्ये उत्तम कामगिरी

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात चेन्नईसाठी चहर पॉवरप्लेमधील सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून उदयास आला. या हंगामात, केकेआर आणि पंजाब किंग्जविरूद्ध सुरुवातीच्या स्पेलमध्ये चहरने विरोधी संघाची दाणादाण उडवली. त्याने पंजाबविरुद्ध १३ धावात ४ गडी बाद केले. आयपीएलच्या इतिहासातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा – गेल्या वर्षी करोनाला ‘पंच’ देणारे भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन

२८ वर्षीय चहरने भारताकडून एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात पदार्पण केले आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी संघात त्याची निवड झालेली नाही. मात्र श्रीलंका दौर्‍यावर चहरची निवड होणे अपेक्षित आहे. जुलै महिन्यात श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीच्या हल्ल्याचे तो नेतृत्व करू शकतो. याशिवाय त्याचा भाऊ राहुल चहर याचीही या दौर्‍यावर निवड होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 10:19 am

Web Title: sakshi dhoni highly impressed on new look of pacer deepak chahar adn 96
Next Stories
1 फ्रेंच ओपनमध्ये रंगणार ‘एल-क्लासिको’ सामना, जोकोविच आणि नदाल असणार आमनेसामने
2 गेल्या वर्षी करोनाला ‘पंच’ देणारे भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन
3 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदालची विजयी वाटचाल!
Just Now!
X