IPL 2020 साठीचा मार्ग रविवारी मोकळा झाला. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी मात्र त्याच्या आधीच या स्पर्धेसाठी तयार झाली आहे.
साक्षीने सोमवारी एक खास फोटो पोस्ट केला. या फोटोत तिने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या जर्सीशी मिळताजुळता पिवळ्या रंगाचा टॉप परिधान करत फोटो शेअर केला. या फोटोला कोणतंही कॅप्शन न देता तिने फोटो सरळ पोस्ट केला. त्यानंतर चेन्नइ संघांच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.
View this post on Instagram
CSKच्या अधिकृत अकाऊंटवरूनदेखील तिच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसचं कौतुक करणारी कमेंट करण्यात आली. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘राजाधिराज’ या चित्रपटातील एका गाण्याचे बोल CSKने पोस्ट केले आणि पिवळ्या पोशाखाबद्दल तिचं कौतुक केलं.
दरम्यान, सर्व संघांना २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली असली तर CSKचा संघ मात्र ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात युएईला रवाना होणार असल्याची चर्चा आहे. परंतु याबद्दल अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 6:42 pm