09 March 2021

News Flash

धोनीच्या वाढदिवसाचा फोटो साक्षीने केला शेअर; पाहा कोण-कोण होतं पार्टीला हजर

लॉकडाउन काळात धोनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांपासून दूर

भारताचा २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली. सुमारे १० ते १२ महिने धोनी क्रिकेटपासून दूर आहे. IPL मधून धोनीचे पुनरागमन होईल असे बोलले जात होते पण IPL चे आयोजन लांबणीवर पडले. मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यापासून धोनी आपली पत्नी साक्षी, लेक झिवा आणि कुटुंबीयांबरोबर रांचीच्या फार्महाऊसवर आहे. तो सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांपासून चार हात लांबच आहे. ७ जुलैला त्याच्या वाढदिवशीदेखील त्याने कोणत्याही प्रकारच्या पार्टीचे फोटो पोस्ट केले नाहीत. पण अखेर त्याची पत्नी साक्षी हिने त्याच्या वाढदिवसाच्या छोटेखानी पार्टीचा फोटो पोस्ट केला.

साक्षीने धोनीच्या वाढदिवसानंतर सुमारे १५ दिवसांनी एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत धोनीचे तीन मित्र होते. त्यासोबतच भारतीय संघातील दोन अष्टपैलू खेळाडू हार्दिक आणि कृणाल पांड्या हे दोघेदेखील होते. कृणालची पत्नी पंखुरीही त्यांच्यासोबत हजर होती. साक्षीने स्वत: हा फोटो क्लिक केला आणि अखेर १५ दिवसांनी पोस्ट केला. त्या फोटोला तिने कॅप्शन दिले की एका आनंदी कुटुंबाला मी मिस करते आहे. या फोटोला एका दिवसात ६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.

 

View this post on Instagram

 

Missing the happy squad !

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि कृणालची पत्नी बडोद्यावरुन खासगी जेट विमानाने रांचीला पोहचले होते. हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळण्यात धोनीचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय संघात अनेक खडतर प्रसंगी धोनीने हार्दिकला आपला पाठींबा दर्शवला आहे. याच कारणासाठी पांड्या धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट रांचीला पोहोचला. धोनी ३९वा वाढदिवस साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 9:10 am

Web Title: sakshi dhoni shares photo of ms dhonis birthday party which has hardik pandya krunal pandya in it vjb 91
Next Stories
1 भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का!
2 लिजंड्स बुद्धिबळ स्पर्धा : आनंदचा सलामीला पराभव
3 “T20 World Cup गेला खड्ड्यात, IPL झालंच पाहिजे”
Just Now!
X