आयपीएल २०२१ पुढे ढकलल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या रांचीच्या घरी वेळ घालवत आहे. सेंद्रिय शेतीव्यतिरिक्त धोनी रांचीतील आपल्या फार्म हाऊसवर आपल्या पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवत आहे. वेळोवेळी त्याची पत्नी साक्षी धोनी घर आणि फार्म हाऊसचे फोटो शेअर करत असते.

अलीकडेच धोनीने स्कॉटलंडमधून शेटलंड पोनी जातीचा हा घोडा विकत घेतला. साक्षीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हा घोडा घरातील पाळीव कुत्र्यांसह खेळत आहे. या व्हिडिओतून धोनीचे प्राणी आणि हा नवीन घोडा यात मैत्री झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – लय भारी..! टीम इंडियाच्या सरावाचा ‘हा’ जबरदस्त व्हिडिओ एकदा पाहाच

 

दुचाकीव्यतिरिक्त धोनीला पाळीव प्राणीही खूप आवडतात. काही धोनीने हा शेटलंड पोनी जातीचा घोडा परदेशातून मागवला होता. २ वर्षांचा हा घोडा जगातील सर्वात लहान जातींपैकी एक आहे. त्याची उंची फक्त ३ फूट आहे. धोनीकडे आधीपासूनच चेतक नावाचा घोडा आहे, जो ११ महिन्यांचा आहे. काही दिवसांपूर्वी साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये धोनी चेतकसोबत वेळ घालवताना दिसला होता. रांची येथील महेंद्रसिंग धोनीच्या साम्बो फार्म हाऊसमध्ये घोडेस्वारीची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी ५-६ घोडे बाहेरून आणावे लागतात.

हेही वाचा – दुर्दैवच अजून काय! दुखापतीमुळे केन विल्यमसन गमावणार पहिला नंबर

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे.  धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.