भारताची महिला धावपटू हिमा दास सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. १९ दिवसांत हिमा दासने ५ सुवर्णपदकांची कमाई करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं केलं. तिच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी हिमा दासचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हिमाचं कौतुक केलं आहे.

तू केलेली कामगिरी खरंच प्रेरणादायी आहे. सलाम बॉस ! अशा शब्दांमध्ये ऋषभ पंतने हिमा दासने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. पाचवं सुवर्णपदक पटकावल्यानंतर खुद्द सचिन तेंडुलकरनेही हिमा दासला फोन करुन तिचं अभिनंदन केलं.

अवश्य वाचा – सचिन तेंडुलकरच्या एका कौतुकाच्या फोनमुळे हिमा दासचा आनंद द्विगुणित

जाणून घ्या हिमा दासच्या सुवर्णकामगिरीचा लेखाजोखा –

२ जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्स
ग्रां. प्री. स्पर्धेत २०० मी. २३.६५ सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.

७ जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्स
मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत २३.९७ सेकंदासह सुवर्ण.

१३ जुलै चेक प्रजासत्ताक
येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स २०० मीटर शर्यतीत २३.४३ सेकंदासह सुवर्ण.

१८ जुलै, चेक प्रजासत्ताक
टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट, २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांसह सुवर्ण.

२० जुलै झेक प्रजासत्ताक
नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. ४०० मीटर शर्यतीत ५२.०९ सेकंदांसह सुवर्णपदक.