News Flash

अ.भा.मानांकन टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुट

एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला,

पांचगणी : रवाइन हॉटेलतर्फे आयोजित केलेल्या ‘एमएसएलटीए’ अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सालसा आहेरने दुहेरी मुकुट पटकावला. एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला, तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीने तेजस्वी काटे व सृष्टी दास जोडीला नमवले.

चौथ्या मानांकीत सालसाने तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित संस्कृतीचा ६-१, ६-१ एक तास, १० मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या अंतिम सामन्यात सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानीसह खेळताना महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि सृष्टीचे आव्हान ६-२, ६-३ असे मोडीत काढले.

पुरुष एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकित सूरज प्रबोधने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेचा ६-३, ६-२ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात पश्चिम बंगालच्या इशाक इक्बाल व तमिळनाडूच्या मोहित मयूर या अव्वल मानांकित जोडीने गुजरातच्या आघरा मौलिन व धर्मिल शहा यांचा ६-१, ६-० असा एकतर्फी पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 2:44 am

Web Title: salsa aher wins double title in all india ranking tennis tournament zws 70
Next Stories
1 मिलर मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत
2 ‘वाडा’च्या बंदीला रशियाकडून आव्हान
3 धर्म बदलण्याचा विचार मनात कधीही आला नाही -कनेरिया
Just Now!
X