13 July 2020

News Flash

सिंगापूर स्लॅमर्सला जेतेपद

स्लॅमर्सने ही लढत २६-२१ अशी जिंकली.

स्टॅनिसलॉस वॉवरिन्काच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेत, सिंगापूर स्लॅमर्सने गतविजेत्या इंडियन एसेसला नमवत जेतेपदावर नाव कोरले. स्लॅमर्सने ही लढत २६-२१ अशी जिंकली. लिजंड्स एकेरीत स्लॅमर्सच्या कालरेस मोयाने एसेसच्या फॅब्रिस सँटोरोवर ६-४ असा विजय मिळवला. महिला एकेरीत स्लॅमर्सच्या बेलिंडा बेनकिकने एसेसच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हावर ६-५ (३) अशी मात केली. मिश्र दुहेरीत एसेसच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीने स्लॅमर्सच्या डस्टीन ब्राऊन आणि कॅरोलिना प्लिसकोव्हा जोडीचा ६-२ असा पराभव केला. पुरुष एकेरीत वॉवरिन्काने बरनार्ड टॉमिकला ६-३ असे नमवले. मार्केलो मेलो आणि वॉवरिन्का जोडीने एसेसच्या रोहन बोपण्णा आणि इव्हान डोडिगचा ६-३ असा धुव्वा उडवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 12:39 am

Web Title: samarsalma win in singapore
Next Stories
1 युवराज परतला
2 महेंद्रसिंग धोनीकडे ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधारपद कायम
3 जेतेपदासाठी चेन्नई-गोवा समोरासमोर
Just Now!
X