News Flash

ऑर्लिन्स खुली  बॅडमिंटन स्पर्धा : समीर वर्मा उपांत्य फेरीत

मीरने स्थानिक खेळाडू लुकास कोव्‍‌र्हिवर रोमहर्षक विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

| April 1, 2018 02:38 am

समीर वर्मा

पारुप्पली कश्यपच्या पराभवामुळे ऑर्लिन्स खुल्या वर्ल्ड सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांच्या आशा समीर वर्मावर आहेत. या स्पर्धेत समीरने सातत्यपूर्ण कामगिरी करून भारताचे आव्हान जिवंत ठेवले आहे. समीरने स्थानिक खेळाडू लुकास कोव्‍‌र्हिवर रोमहर्षक विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्विस खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अव्वल मानांकित समीरला उपांत्यपूर्व फेरीत विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. एक तास आठ मिनिटांच्या चुरशीनंतर समीरने १७-२१, २१-१९, २१-१५ अशा फरकाने कोव्‍‌र्हिवर विजय मिळवला. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी समीरला नेदरलँड्सच्या मार्क कॅल्जोवच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

दुसरीकडे मात्र भारताच्या कश्यपला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या मानांकित डेन्मार्कच्या रॅस्मुस जेम्कने पाचव्या मानांकित कश्यपवर २१-१८, २१-१४ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. पुरुष दुहेरीत फ्रान्सिस अ‍ॅल्वीन आणि के. नंदगोपाळ यांचेही आव्हान संपुष्टात आले. मार्क लॅम्सफुस आणि माव्‍‌र्हिन इमिल सेईडेल या जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित जोडीने १९-२१, २१-१४, २१-८ अशा फरकाने भारतीय जोडीवर मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 2:38 am

Web Title: sameer verma enters semifinals of orleans open
Next Stories
1 भारतीय क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचा आढावा
2 IPL 2018 – डेव्हिड वॉर्नरला पर्याय मिळाला, इंग्लंडचा खेळाडू करणार सनराईजर्स हैदराबादचं प्रतिनिधीत्व
3 कसोटी क्रिकेटसाठी श्रीलंकन खेळाडूने नाकारली आयपीएलची ऑफर, हैदराबादकडून खेळण्यास दिला नकार
Just Now!
X