सहाव्या फेरीत विश्वा शाहकडून बरोबरी पत्करावी लागल्यानंतर आठव्या फेरीत पुन्हा एकदा हरिकृष्णनवर त्याच बरोबरीला सामोरे जावे लागले. आठव्या डावात सम्मेद शेटेने हरिकृष्णनविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवून चेस किंग आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पध्रेत जेतेपदाच्या दिशेने पावले टाकली.
सलग सात विजय मिळवणाऱ्या सम्मेदला नवव्या आणि शेवटच्या डावातील बरोबरीसुद्धा विजेतेपदावर शिक्कामोर्तब करून देण्यासाठी पुरेशी ठरेल. साक्षी चितलांगे, भाविक भारांबे आणि हरिकृष्णन हे तिघेही ७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. सम्मेदचा पराभव या तिघांपकी एकाचे भाग्य उजळवू शकतो.