वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेपूर्वी करारावर स्वाक्षरी करण्यावरून झालेल्या वादामुळे विंडीज संघाची जागतिक स्तरावर नाचक्की झाली. या वादातही डॅरेन सॅमीने विश्वचषक स्पध्रेसाठी सक्षम संघ निवडला, परंतु वादामुळे संघाने गमावलेला विश्वास विश्वचषक जेतेपद पटकावल्यानंतर पुन्हा मिळवू शकतो, असे मत सॅमीने व्यक्त केले आहे. २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत वेस्ट इंडिजने सॅमीच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. तो पुढे म्हणाला, ‘‘जेतेपद हेच आमचे लक्ष्य आहे. आमच्या क्रिकेटची परिस्थिती पाहता जगज्जेतेपद हे आमच्यासाठीच नव्हे, तर मायदेशातील प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. आमच्या क्रिकेटची परिस्थिती पाहता जगज्जेतेपद हे आमच्यासाठीच नव्हे, तर मायदेशातील प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. मैदानावर पाऊल टाकल्यानंतर करार आणि इतर समस्यांची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करायला हवी.’’