News Flash

संदीप पाटील यांचा मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)च्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ‘‘पाटील यांचे राजीनामापत्र माझ्याकडे आले आहे आणि ते

| April 3, 2013 03:08 am

 राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)च्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ‘‘पाटील यांचे राजीनामापत्र माझ्याकडे आले आहे आणि ते मंजूर व्हायचे आहे. आगामी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
‘‘स्थानिक सामने पाहणे शक्य नसल्यामुळे पाटील यांनी नैतिकतेने विचार करून या जबाबदारीचा त्याग केला आहे,’’ असे दलाल यांनी सांगितले. स्वत: पाटील यांनीही राजीनाम्याची कबुली दिली आहे.
‘‘पाटील यांनी राजीनाम्याबाबत माझ्याशी अद्याप चर्चा केलेली नाही,’’ असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. स्थानिक हंगामाची नुकतीच सांगता झाली असून, मुंबईने यंदा ४०व्या रणजी जेतेपदाला गवसणी घातली.
दरम्यान, एमसीएने भारताचे यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित यांच्याकडे तांत्रिक समितीचे अध्यक्षपद सोपवले आहे. याआधी क्रिकेट सुधारणा समिती कार्यरत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:08 am

Web Title: sandeep patil given the resignation form selection bord of mumbai
टॅग : Sandeep Patil
Next Stories
1 ब्राझीलच्या लष्करशाही सत्ताधिकाऱ्यांकडून पेले यांची चौकशी झाली होती
2 चर्चिल ब्रदर्सचा सफाईदार विजय
3 बिशप, फाल्कनची विजयी घोडदौड
Just Now!
X