15 December 2017

News Flash

संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये पार केला १० हजार धावांचा पल्ला

आजपासून (बुधवार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने कसोटी क्रिकेटमध्ये

मेलबर्न | Updated: December 26, 2012 12:38 PM

आजपासून (बुधवार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर सुरु झालेल्या सामन्यात चौकार मारून संगकाराने दहा हजारांच्या क्लबमध्ये पाऊल ठेवले. कसोटीमध्ये दहा हजार धावा पल्ला पार करणारा संगकारा जगातील अकरावा आणि श्रीलंकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. संगकाराने ११५ कसोटी सामन्यांमध्ये १९५ डावांत ही कामगिरी केली आहे. यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांनी केली आहे.

First Published on December 26, 2012 12:38 pm

Web Title: sangakkara notches 10000 runs
टॅग Sangakkara