कोकणात प्रथमच आयोजित भाई नेरुरकर स्मृतिचषक खो-खो स्पध्रेतील किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सांगली संघाने ठाण्यावर तर किशोरी गटात पुण्याच्या संघाने ठाणे संघावर केवळ १ गुणाने मात करत विजेतेपदाचा मान पटकावला.
प्रमोद महाजन क्रीडा संकुलात गेले चार दिवस चालू असलेल्या या स्पध्रेतील किशोरी गटाच्या अंतिम सामन्यामध्ये पुण्याची गाठ ठाणे संघाशी पडली. अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुण्याने केवळ १ गुणाने (९-८) ठाण्याचा पराभव करत जेतेपद पटकावले. पुण्याकडून प्रियांका इंगळे (२ व २.५० मिनिटे, २ गडी बाद), वृषाली घोगले (२ मिनिटे) आणि भाग्यश्री जाधव (२.१० मिनिटे) यांनी संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. पराभूत ठाणे संघाकडून अनुष्का तोतवे (२.४० मिनिटे व २ गडी बाद) आणि विद्या कदम (३.३० मिनिटे व ३ गडी बाद) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.
किशोर गटाच्या अंतिम सामन्यामध्ये सांगलीच्या खेळाडूंनी अतिशय दमदार आणि वेगवान खेळ करत पहिल्या अध्र्या डावातील पिछाडी भरून काढली आणि अखेरीस ठाणे संघाचा ३० सेकंद राखत १ गुणाने पराभव केला. विजयी संघाकडून प्रथमेश शेळके (२ मिनिटे, २ गडी बाद) आणि अभिषेक केरीपाळे (१.३० मिनिटे व ४ गडी बाद) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. तर पराभूत ठाणे संघाकडून शुभम उतेकरने सहा गडी बाद केले.
स्पध्रेच्या आजच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी किशोर गटातील उपांत्य फेरीत ठाण्याच्या संघाने कोल्हापूरवर केवळ एक गुणाने विजय मिळवला. त्यामध्ये ठाण्याकडून अमेय झगडे व विनय राठोड यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.
सवोत्तम खेळाडू
ल्ल   किशोर गट
आक्रमण : शुभम सुपेकर (सांगली), अष्टपैलू : विश्वजित फारणे (सांगली), संरक्षण : अक्षय देवळेकर (कोल्हापूर)
ल्ल   किशोरी गट
आक्रमण : आरती कदम (मुंबई), अष्टपैलू : प्रियंका इंगळे (पुणे), संरक्षण : दीक्षा कदम (पुणे)

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: ऋषभ पंतचं रिव्ह्यू न घेणं दिल्ली संघाला पडलं महागात, पाहा सामन्यात नेमकं काय घडलं?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’