24 February 2021

News Flash

सानिया-मार्टिनाची विजयी सलामी

या जोडीने अ‍ॅनास्टासिया रोडिओनोव्हा आणि अरिना रोडिओनोव्हा जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.

| January 13, 2016 07:06 am

सानिया-मार्टिन

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सिडनी खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. या जोडीने अ‍ॅनास्टासिया रोडिओनोव्हा आणि अरिना रोडिओनोव्हा जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.

या विजयासह सानिया-मार्टिना जोडीने सलग २७ सामन्यांत अपराजित राहण्याची परंपरा कायम राखली. या जोडीने काही दिवसांपूर्वीच ब्रिस्बेन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सिडनी स्पर्धेतही ही जोडी जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. वर्षांतील पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी तयारी म्हणून सिडनी स्पर्धा आयोजित करण्यात येते. दरम्यान एटीपी स्पर्धेत रोहन बोपण्णाने रोमानिआच्या फ्लोरिन मर्गेआच्या साथीने खेळताना डेनिस इस्टोमिन आणि हेन्री कोंटिनेन जोडीवर ६-७, ६-३, १०-८ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 7:06 am

Web Title: sania martina extend winning streak in sydney
टॅग Sania
Next Stories
1 फिक्सिंगपासून उदयोन्मुख संघांनी दूर राहावे झ्र्कटलर
2 पश्चिम रेल्वेला विजेतेपद
3 रोहितची दीडशतकी खेळी व्यर्थ, भारताला पराभवाचा धक्का
Just Now!
X