अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडी चालू वर्षांतील पाचव्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे. एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया-मार्टिना जोडीने व्हॅनिया किंग आणि अ‍ॅला कुद्रयात्सेव्हाचा ६-२, ६-० असा पराभव केला.

स्टुटगार्ड स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीने सलग दुसऱ्या स्पध्रेत अंतिम फेरी गाठली आहे. या जोडीने आपल्या अद्वितीय कामगिरीच्या बळावर नऊ विजेतेपदांना गवसणी घातली आहे.

अंतिम फेरीत त्यांच्यासमोर पाचव्या मानांकित कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लादेनोव्हिक यांचे आव्हान असणार आहे. कॅरोलिन-क्रिस्टिना जोडीने आठव्या मानांकित एलिना व्हेसनिना आणि एकटेरिना माकारोव्हा जोडीचा ६-२, ६-३ असा पराभव केला.