News Flash

क्रमवारीत सानिया सहाव्या स्थानावर

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी कारा ब्लॅक यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रमवारीच्या महिला दुहेरी विभागात सहावे स्थान प्राप्त

| June 10, 2014 12:36 pm

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी कारा ब्लॅक यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रमवारीच्या महिला दुहेरी विभागात सहावे स्थान प्राप्त केले आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सानियाचे हे सर्वोच्च स्थान आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया आणि कारा यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या कामगिरीमुळे या दोघींनी आठ स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. इंडोनेशियातील स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या अंकिता राणाने महिला एकेरीमध्ये २६२वे स्थान पटकावले आहे. पुरुष एकेरीमध्ये सोमदेव देवबर्मनची २३ स्थानांनी घसरण झाली असून तो ११९व्या स्थानावर गेला आहे. पुरुष दुहेरीमध्ये लिएण्डर पेस तेराव्या आणि रोहन बोपण्णा १७व्या स्थानावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2014 12:36 pm

Web Title: sania mirza achieves career best ranking of six in doubles
टॅग : Sania Mirza
Next Stories
1 विल्यमसनचे नाबाद शतक
2 ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू फर्नाडोचे अपघाती निधन
3 मुंबई महापौर बुद्धिबळ स्पर्धा : जॉर्जियाचा ग्रँडमास्टर लीव्हानला जेतेपद
Just Now!
X