विम्बल्डन स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने महिलांच्या दुहेरी सामन्यात स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्यासमवेत विजेतेपट पटकाविले.  विम्बल्डनचे विजेतेपदक पटकाविणारी सानिया मिर्झा ही पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे. तर मार्टिना हिंगीसने १९९७ ला पहिल्यांदा विम्बल्डन जिंकले होते.
महिलांच्या या जोडीने मकारोवा-एलेना वेस्नीना जोडीचा ५-७, ७-६ (७-४), ७-५ असा पराभव केला. हा सामना २ तास ४७ मिनिटे चालला. विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीत जेतेपद मिळविणाऱ्या सानियाला आपली जोडीदार मार्टिना सोबत तीन कोटी ३४ लाख रुपयांचे बक्षिस आणि चषक मिळाल आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा आम्ही अधिक चांगला खेळ केला. माझी भागीदार सानियाने अतिशय उत्कृष्ठ खेळ केला. तिसऱ्या सेटमध्ये ५-२ या फरकाने आम्ही खेळत होतो तेथून आम्ही खेळात परतलो असे हिंगीसने म्हटले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाचे अभिनंदन केले आहे.