News Flash

इझान आपल्या बाबांना कधी भेटू शकेल मला माहिती नाही ! पतीच्या आठवणीने सानिया मिर्झा भावूक

शोएब मलिक लॉकडाउन काळात पाकिस्तानमध्ये

जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचा सामना करण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र अनेक दिग्गज खेळाडूंचा धीर आता थोडासा का होईना सुटू लागलेला आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा लहान मुलगा इझान सध्या भारतात आहेत, तर सानियाचा पतीन शोएब मलिक पाकिस्तानात अडकला आहे. काही महिन्यांपूर्वी टेनिस कोर्टवर पुनरागमन केलेल्या सानिया मिर्झाने चांगली कामगिरी केली. मध्यंतरीच्या काळात स्पर्धेसाठी सानिया अमेरिकेत तर शोएब मलिक पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेत खेळत होता. मात्र यानंतर लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सानिया आणि शोएब आपापल्या देशांमध्ये अडकले आहेत.

“शोएब पाकिस्तानात अडकलाय, मी भारतामध्ये. अशा परिस्थितीचा सामना करणं खरंच कठीण असतं, कारण आम्हाला लहान मुलगा आहे. इझान आपल्या बाबांना पुन्हा कधी पाहू शकेल मला माहिती नाही. आम्ही दोघेही खूप सकारात्मक आहोत, आजुबाजूच्या परिस्थितीची आम्हाला जाण आहे. शोएबची आई ६५ वर्षांची आहे, तिची काळजी घेणंही या काळात गरजेचं आहे. सध्याच्या काळात आपण सर्वजण तंदुरुस्त राहू आणि लॉकडाउन संपल्यानंतर एकमेकांना पुन्हा भेटू हीच इच्छा सध्या माझ्या मनात आहे.” सानिया इंडियन एक्सप्रेस सोबत फेसबूक लाईव्हमध्ये बोलत होती.

सध्याच्या खडतर काळात टेनिस किंवा सरावाचा विचार आपल्या मनात येत नसल्याचंही सानियाने स्पष्ट केलं. बाहेर परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत माझ्या लहान मुलाची सुरक्षा कशी केली जाईल हाच विचार पहिले मनात येतो. घरात आई-बाबा असल्यामुळे त्यांचीही या कामात मदत होते. काही महिन्यांपूर्वी पुनरागमन केलेल्या सानियाने होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. याचसोबत काही दिवसांपूर्वीच सानियाला टेनिस क्षेत्रातील Fed Cup Heart Award या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 10:37 am

Web Title: sania mirza live i dont know when my son will be able to see his father again psd 91
Next Stories
1 स्टीव्ह वॉ सर्वात स्वार्थी क्रिकेटपटू – शेन वॉर्न
2 विराटचा एक रिप्लाय अन् वादच संपला…
3 पुनरागमनानंतरही करोनाचा धोका कायम -मेसी
Just Now!
X