08 March 2021

News Flash

चीन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया-मार्टिना अजिंक्य

भन्नाट फॉर्म कायम राखत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने आठव्या जेतेपदाची कमाई केली.

सानिया-मार्टिना अजिंक्य

यंदाच्या हंगामातला भन्नाट फॉर्म कायम राखत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने आठव्या जेतेपदाची कमाई केली. चीन खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने तैपेईच्या हाओ चिंग चान आणि युंग जॅन चान जोडीवर ६-७ (९), ६-१, १०-८ असा विजय मिळवला. संघर्षमय लढतीत तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये ७-७ अशी बरोबरी होती. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत सानिया-मार्टिना जोडीने सलग तीन गुणांची कमाई करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जोडीचे हे चौथे सलग जेतेपद आहे. सानियासाठी २०१५ मध्ये मार्टिनासह खेळताना आठवे तर एकूण नववे जेतेपद आहे. बेथानी मॅटेक सँड्सच्या साथीने खेळताना तिने एक जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात सानिया-मार्टिना जोडीने इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्बल्डन, अमेरिकन खुली स्पर्धा, गुआंगझाऊ, वुहान आणि बीजिंग स्पर्धाच्या जेतेपदावर नाव कोरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 2:16 am

Web Title: sania mirza martina hingis won title
Next Stories
1 तिची स्पर्धा हिमालयाशी!
2 ब्लाटर निलंबनाविरोधात दाद मागणार
3 आधुनिक वीरूचा उदय
Just Now!
X