News Flash

सात महिन्यांचा विरह अखेरीस संपला, शोएब मलिक-सानिया मिर्झाची दुबईत भेट

सोशल मीडियावर शेअर केला भेटीचा फोटो

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका अनेकांना बसला. भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे देखील लॉकडाऊन मध्ये आपापल्या देशांमध्ये अडकले होते. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी शोएब मलिकने आपली पत्नी सानियाची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये लॉकडाउनच्या नियमांत सरसारने हळुहळु शिथीलता आणली आहे.

हैदराबादमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत असलेल्या सानिया मिर्झाने यावेळी विशेष परवानगी काढून आपला मुलगा इझानसोबत दुबईला जात आपला पती शोएबची भेट घेतली आहे. शोएब मलिकने आपल्या मुलासोबत भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यात शोएब मलिक टी-२० मालिकेत सहभागी झाला होता. या दौऱ्यावर जाण्याआधी शोएबने सानियाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतू लॉकडाउनच्या नियमामुळे त्याला हे जमलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 7:42 pm

Web Title: sania mirza meets husband shoaib malik after seven months in dubai psd 91
Next Stories
1 जॉन्टी ऱ्होड्स बनला स्वीडन क्रिकेट संघाचा प्रशिक्षक
2 हरभजन सिंहचे ४ कोटी उद्योगपतीने थकवले, पोलिसांत तक्रार दाखल
3 Video : धिप्पाड रखिम कॉर्नवॉलने करुन दाखवलं, मैदानात एका हाताने घेतला सुरेख झेल
Just Now!
X