24 September 2020

News Flash

सानिया मिर्झाला सेवा कर विभागातर्फे नोटीस

निर्दोषत्व सिद्ध न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा.

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा. (संग्रहित)

टेनिस पटू सानिया मिर्झाला सेवा कर विभागाने नोटीस पाठवली आहे. सानिया मिर्झाने सेवा कर चुकवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. एकूण २० लाख रुपयांचा कर तिने भरलेला नाही.  ६ फेुब्रुवारी रोजी ही नोटीस पाठविण्यात आली असून १६ फेब्रुवारीपर्यंत तिला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत हे उत्तर देता येता येणार आहे.

सानिया मिर्झाने वित्त कायदा १९९४ नुसार सेवा कर बुडवल्याप्रकरणी चौकशी सुरू झाली असून तुमच्याजवळ याबाबतची जी कागदपत्रे आहेत ती घेऊन यावी असे प्रमुख सेवा कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्काच्या वित्त कायदा १९९४ नुसार ही कारवाई होत असून या संदर्भात तुमचे निर्दोषत्व सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यात यावी असे सेवा कर विभागाने म्हटले आहे.

जर कागदपत्रे दाखविण्यास सानिया मिर्झा असमर्थ राहिली तर भारतीय दंड विधानानुसार तिच्यावर कारवाई होईल असे नोटीसमध्ये म्हटले गेले आहे. तुमच्याजवळ याबाबत नक्कीच स्पष्टीकरण असेल तेव्हा स्वतः हजर राहून किंवा प्रतिनिधीमार्फत तुमची बाजू मांडावी असे या नोटीसमध्ये लिहिले असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 9:54 am

Web Title: sania mirza service tax department excise duty finance act
Next Stories
1 India vs Bangladesh : कोहली, मुरली विजयची शतकी खेळी, भारत मजबूत स्थितीत
2 जागतिक नेमबाजी स्पर्धामधील बदल अयोग्य – गगन नारंग
3 अजिंक्यचे योगदान नाकारून चालणार नाही – कोहली
Just Now!
X