14 August 2020

News Flash

शोएबनं लाइव्ह चॅटमध्ये केलं माहिराशी फ्लर्ट; सानियाने मध्येच विचारलं…

वाचा नक्की काय म्हणाली सानिया मिर्झा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा या जोडीची कायम चर्चा होत असते. त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते त्यांच्या राहणीमानापर्यंत साऱ्या गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. पण नुकतेच हे दोघे एक वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. करोनामुळे क्रिकेट सामने बंद असल्याने सध्या शोएब मलिकने पाकिस्तानातील काही सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या भागात शोएबने गायक अतिफ असलम याची मुलाखत घेतली होती. तर ताज्या भागात त्याने अभिनेत्री माहिरा खान हिला आमंत्रित केलं होते.

माहिरा खानशी ऑनलाइन मुलाखतीसाठी संपर्क करताना अचानक लाइव्ह चॅटमध्ये थोडीशी समस्या उद्धभली. त्यावेळी शोएब आणि माहिरा दोघांनाही काय करावं? ते समजलं नाही. अखेर शोएबने घरातल्या सदस्याच्या मदतीने पुन्हा कनेक्शन जोडलं आणि मुलाखत सुरू झाली. पुन्हा मुलाखत सुरू झाली, तेव्हा माहिरा शोएबला म्हणाली की आपण दोघेही म्हातारे झालो आहोत कारण आजच्या पिढीचं हे ऑनलाइन वगैरे काही कळत नाही. त्यावर उत्तर देताना शोएबने फ्लर्ट करण्याच्या सुरात तिला ‘मी म्हातारा झालोय हे मान्य आहे, पण तू मात्र अजून तरूण आहेस’, असे म्हणाला.

त्यांचा हा संवाद लाइव्ह सुरू असताना सानिया मिर्झाने मध्येच कमेंट केली. “हम्म…. मी बघते आहे… तुम्ही काय गप्पा मारताय ते…”, असा रिप्लाय सानियाने दिला.

दरम्यान, एका पाकिस्तानी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शोएबने सानिया मिर्झासोबत लग्न आणि भारत-पाकमधील तणावाच्या संबंधांवर भाष्य केलं होतं. “सानियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी कोणत्याही पद्धतीने तणावात नव्हतो. तुमचा जोडीदार कोणत्या देशाचा आहे, राजकीय परिस्थिती काय आहे याची तुम्हाला चिंता नसते. तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करताय का आणि तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं आहे का इतकाच मुद्दा महत्वाचा असतो. मग तुम्ही कोणत्याही देशाचे का असेना…तसं बघायला गेल्यास माझे अनेक मित्र भारतीय आहेत, आम्ही बोलताना कधीही दोन देशांमधले तणावाचे राजकीय संबंध मध्ये येत नाही. कारण मी खेळाडू आहे, राजकारणी नाही.” शोएबने आपली बाजू स्पष्ट केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 4:43 pm

Web Title: sania mirza shoaib malik how bhabhi of pakistan sania reacted after seeing shoaib flirt with mahira khan vjb 91
Next Stories
1 WC 2019 Video : टीम इंडियाच्या दणक्याने आजच स्पर्धेबाहेर गेला होता वेस्ट इंडिजचा संघ
2 “संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्यामुळे धोनीच्या जागी ‘हा’ खेळाडू संघात”
3 पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, “IPL म्हणजे…”
Just Now!
X