20 January 2018

News Flash

दुबई टेनिस : सानिया-बेथानी अंतिम फेरीत

दुबई : भारताच्या सानिया मिर्झा हिने दुबई डय़ुटी फ्री चषक टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली. तिने बेथानी मॅटेक-सँड्स हिच्या साथीत अनास्ताशिया रोदिओनोवा (ऑस्ट्रेलिया)

Updated: February 23, 2013 5:02 AM

दुबई : भारताच्या सानिया मिर्झा हिने दुबई डय़ुटी फ्री चषक टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली. तिने बेथानी मॅटेक-सँड्स हिच्या साथीत अनास्ताशिया रोदिओनोवा (ऑस्ट्रेलिया) व कारा ब्लॅक (झिम्बाब्वे) यांच्यावर ६-२, ७-५ असा विजय मिळविला. सव्वा तास चाललेल्या या सामन्यात सानिया व बेथानी यांना दुसऱ्या सेटमध्ये विजय मिळविण्यासाठी झुंजावे लागले. त्यांनी फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. या जोडीने जानेवारीत ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते.

First Published on February 23, 2013 5:02 am

Web Title: saniya bethani in final round
टॅग Sports,Tennis
  1. No Comments.