News Flash

संजय बांगरने बांगलादेशच्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव फेटाळला

बांगर २०१४ ते २०१९ या कालावधीत भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते

| March 19, 2020 05:04 am

नवी दिल्ली : भारताचे फलंदाजीचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणास्तव बांगलादेश क्रिकेट मंडळाचा कसोटी प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव फेटाळला आहे. आठ आठवडय़ांआधी बांगर यांना बांगलादेशच्या कसोटी संघासाठी फलंदाजीच्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र स्टार स्पोर्ट्सशी दोन वर्षांकरिता करारबद्ध असल्यामुळे बांगर यांनी तो प्रस्ताव फेटाळला. परंतु भविष्यात मी बांगलादेश संघाला मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे, असे बांगर यांनी सांगितले.

बांगर २०१४ ते २०१९ या कालावधीत भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या जागी विक्रम राठोड यांची नियुक्ती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 5:04 am

Web Title: sanjay bangar rejects bangladesh coach offer zws 70
Next Stories
1 अमेरिकन ग्रँडस्लॅमनंतर फ्रेंच स्पर्धेचे आयोजन गैरसोयीचे
2 ऑलिम्पिकसमोरील करोनाच्या आव्हानावर कोणताही उपाय नाही!
3 नागरिकांनी अधिक जबाबदार व्हावे, हीच निसर्गाची इच्छा’
Just Now!
X